
वार्ताहर/चाफळ : सह्याद्रीच्या कुशीत चाफळ खोऱ्यातील डोंगरमाध्यावर वसतेले कोळेकरवाडी हे अतिशय दुर्गम छोटंस गाव. या गावात जिल्हा परिषदेची पाचवी पर्यतची शाळा असून लोकसहमागातून अनेक भौतिक सुविधांची पु्र्तता शाळेत केली आहे, शाळेचं रुपडं बदलणाऱ्या शिक्षकाने ‘ डोंगरावरच शाळेची परसबाग फुलवत “उपक्रम एक उदिेष्टे” अनेक ची अनुभुती दिली आहे.
कोळेकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील उफक्रमशील शिक्षक म्हणून ओळख निर्माण केलेले सोमनाथ मुजूमले यांनी दीड वर्षात लोकसहमागातून शाळेचे रुपडे पालटले, त्यांनी आता शाळेच्या सांडपाण्यावर सेंद्रिय पध्दतीने परसबाग फुलवली आहे.
सोमनाथ मुजूमले यांनी अनेक हेतूनी शाळेत परसबाग उभारप्याचा निर्णय घेतला, मात्र डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, जागेची अनुपलब्यता यामुळे आव्हाने अनेक होती. मात्र यावर मात करून लोकसहभागातून शाळेमागच्या माळरानाचे सपाटीकरण केले, जागेची मशागत केली आणि जून महिन्यात परसबागेत रोपांची लागवड केली. मात्र पावसामुळे बरेच नुकसान झाले. तरीही त्यांनी हताश न होता रोपांची पुनर्लागवड केली.
विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी व शिक्षकांनी मदत केली. आज परसबाग अतिशय जोमाने उभी आहे, परसबाग उभारणीसाठी मुख्याध्यापक सोमनाथ मुजूमले, शिक्षक योगेश माने, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी सहकार्य केले. तर गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर, विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख सुरेश मगर यांनी मार्गर्शन केले.




