
राजगुरूनगर : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा ०४ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला.
अपूर्व विज्ञान मेळावा व शालास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजित लुणावत, संचालक हिरामण सातकर रेखाताई श्रोत्रिय, डॉ प्रदिप शेवाळे, उमाताई सांडभोर, स्वानंद खेडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका आस्मिता पाठक, पर्यवेक्षक रेखा जाधव,सोपान निसरड, हौशीराम मुठे, सुनीता ठाकूर, लतिफ शाह ,कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ पिलगर व पर्यवेक्षक संदेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनात आरोग्य, कृषी, दळणवळण, ऊर्जा,जल व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सुरक्षा, संसाधन व्यवस्थापन या विषयांवर विद्यार्थ्यांनी एकूण १८२ नावीन्यपूर्व वैज्ञानिक प्रकल्प सादर केले.

सदर प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख जयंत शिंदे यांनी केले. विज्ञान अध्यापक कांचन शेलार, संध्या कातळे, गणपत घारे, रवींद्र घनवट, शिल्पा जाधव, रेश्मा साळे, दिगंबर ऐवळे, ,स्मिता निकम, छाया भालेराव, प्रियांका गायकवाड, राजेश सूळ, प्रतिभा बारणे, पूजा मुळूक यांनी सहकार्य केले.




