महात्मा गांधी विद्यालयात नेत्रदीपक दीपोत्सव सोहळा
लतीफ शाह सर

राजगुरुनगर, दि. १७ : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दीपावलीनिमित्त दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक हिरामण सातकर, प्रदीप कासवा, गणेश घुमटकर, उमाताई सांडभोर, राहुल कुंभार, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे उपस्थित होते.

विद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे यांच्या संकल्पनेतून दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक पर्यवेक्षिका रेखा जाधव, पर्यवेक्षक सोपान निसरड, हौशीराम मुठे, सुनीता ठाकूर, लतीफ शाह, अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यालयाच्या भव्य मैदानावर MGV व शुभ दीपावली ह्या आकाराच्या पणत्या पेटविण्यात आल्या होत्या. विद्यालयाची संपूर्ण इमारत, कार्यालय, दत्तमंदिर, विद्यालयाचा परिसर मेणाच्या दिवे, विद्युत माळा, रांगोळी याने सुशोभित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील, शुभेच्छा पत्रे यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. दिवाळीच्या शुभेच्छा असलेला सेल्फी पॉईंट बनविण्यात आला होता. संपूर्ण सोहळ्याचे नियोजन विद्यालयाच्या दीपोत्सव समितीच्या सुषमा कल्हाटकर, वर्षा घोरपडे व सहकारी अध्यापक व अध्यापिकांनी केले.




