शालेय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मुलींच्या संघाला विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाचे यश
लतीफ शाह सर

राजगुरुनगर, दि.२६ : शालेय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मुलींच्या संघाने विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाचे दैदीप्यमान यश संपादन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्या संध्या कांबळे यांनी दिली.
अहिल्यानगर येथे विभागस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. विद्यालयातील क्रीडाशिक्षिका वर्षा गुट्टे व सर्व क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव गणेश जोशी, संचालक मंडळ, प्राचार्या संध्या कांबळे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व राज्यस्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजयी संघातील खेळाडूंची नावे :
वैष्णवी सोमनाथ थिगळे, वेदांती विष्णू गुट्टे, समीक्षा आण्णा देवाडे, निविता युवक बोगटी, श्रावणी विक्रम गावडे, श्रावणी विनोद इंगवले, दिव्या गणेश सातकर, श्रावणी राहुल गाडे, पूर्वा संजय गोरडे,सोनाक्षी कल्याणराव गलांडे, वैष्णवी शरद पवळे, कार्तिकी संजय नरवडे.




