“कैलास पाचारणे” राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित
प्रशासकीय व शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान

राजगुरुनगर/प्रतिनिधी : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे निवृत्त प्रबंधक व खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
नुकताच रविवार (दि.१८) पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरीयल हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशनच्या, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी विविध क्षेत्रातील एकूण २० मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) निवृत्त अधिकारी व यशदा संस्थेचे अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत असलेले शेखर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष संजय पवार, पुणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. संतोष भोसले, जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश चौधरी, पुणे शहर अध्यक्ष प्रा.श्रीकांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

चाकण व राजगुरुनगर महाविद्यालयातील सेवा कालावधीत त्यांनी अनेक शैक्षणिक सामाजिक व प्रशासकीय कार्यात स्वतःचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापकीय अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव गणेश जोशी, तीनही विद्यालयांचे मुख्याध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले.





बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा.⛽️९०२११३२१२१