शिक्षकांच्या मागण्यांसाठी ‘शिक्षक भारती संघटने’चा धरणे आंदोलनाचा इशारा : माजी शिक्षक आमदार कपिल पाटील
लतीफ शाह सर

राजगुरुनगर, दि. २९ (विशेष प्रतिनिधी) : टीईटी व जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने डिसेंबर महिन्यात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची राज्यस्तरीय ऑनलाईन मीटिंग शिक्षक भारतीचे संस्थापक माजी आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष श्री नवनाथ गेंड यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली.
या बैठकीला राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारणी पदाधिकारी यांच्यासह जिल्हाध्यक्ष, जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
बैठकीमध्ये शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर व मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना बंधनकारक केलेल्या टीईटी परीक्षा, वस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा , जुनी पेन्शन योजना, जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत विस्थापित झालेले शिक्षक, प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी सविस्तर मत मांडून सर्वांचे शंका निरसन केले.
शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत सेवेत कार्यरत असलेल्या आपल्या शिक्षक बांधवांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार नाही संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. वस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा , जुनी पेन्शन लागू करणे हे विषय मार्गी लागण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.
या बैठकीला राज्य सरचिटणीस भरत शेलार, राज्य कार्याध्यक्ष दिनेश खोसे, कोषाध्यक्ष किशोर कदम, महिला अध्यक्षा श्रीमती स्वाती बेंडभर, राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, बबन गावडे, दया नाईक, संजय मस्के, प्रकाश ब्राह्मणकर, किशोर कुमावत, दीपक दराडे, सह-सरचिटणीस जानकीराम घाडगे, संपर्क प्रमुख संतोष ताठे, यांच्यासह पप्पू मुलानी, चिमणाजी दळवी, दीपक पाटील, सतीश रावजादे, सतीश हूले, दशरथ गावडे , सतिश ढेरे यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष, विभागीय कार्यकरिणी व पदाधिकारी उपस्थित होते.




