आरोग्य व शिक्षणक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
इरफान खान या विद्यार्थ्याचे दिल्ली येथे राष्ट्रीय योगासन स्पर्धेत यश
परिसरातून विद्यार्थ्याचे कौतूक
कात्रज परिसरातील 15 वर्षीय इरफान इर्शाद खान या विद्यार्थ्याने दिल्ली येथे राष्ट्रीय योगासना स्पर्धेत मुकबधीर श्रेणीत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल बाबाजीनगर हाउसिंग सोसायटीतर्फे शनिवार दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सत्कार करण्यात आला.
आंबेगाव पोलीस स्टेशन सिनियर पोलिस इन्स्पेक्टर शरद झिने साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब निवंगुणे, प्रसिद्ध कुस्तीपटू संग्रामभैय्या बाबर तसेच बाबाजीनगर सोसायटीतील सभासद व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.





