पुणे जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मुलींचा संघ प्रथम
लतीफ शाह, सर

राजगुरुनगर : (प्रतिनिधी) पुणे जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती प्राचार्या संध्या कांबळे यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील पोपटराव गावडे माध्यमिक विद्यालयात पुणे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ३९ संघांनी सहभाग घेतला.
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात खेड तालुका महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे.
विजयी संघातील खेळाडूंची नावे :
वैष्णवी थिगळे, समीक्षा देवाडे, श्रावणी इंगवले, श्रावणी गाडे, वेदांती गुट्टे, कार्तिकी नरवडे, श्रावणी गावडे, वैष्णवी पवळे, दिव्या सातकर, निविता बोगटी, सोनाक्षी गलांडे, पूर्वा कोरडे.
विद्यालयातील क्रीडाशिक्षक नितीन वरकड, वर्षा गुट्टे, अशोक सांडभोर, दिपक चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षक सोपान निसरड, रेखा जाधव, हौशीराम मुठे, लतीफ शाह, सुनिता ठाकूर यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ शेठ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव गणेश जोशी, सर्व संचालक मंडळ यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व विभागस्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




