
चाफळ : चाफळसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेला’ पाऊस रब्बी हंगामातील पेरणीसाठी व्यत्यय ठरत आहे. पावसाची उघडीप बघत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील मशागतीच्या कामांना प्रारंभ केला आहे. वापसा आलेल्या ठिकाणी बळीराजाने ” पेरणीस ‘ वेग घेतला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सध्या बळीराजा खब्बी हंगामाच्या पेरणीच्या व मशागतीच्या कामात व्यस्त’ झाला आहे. ‘चाफळसह विभागातील माजगाव, शिंगणवाडी, गमेवाडी, वागजाईवाडी, डेखण, कडववाडी, नाणेगाव. जाळगेवाडी, जाधववाडी या परिसरात मुख्यत्वे सोयाबीन पिकांची पेरणी केली जाते., आता बहतेक सर्वत्र सोयाबीन काढून मळून झाले आहे. त्यामुळे मोकळ्या शिवारात सध्या शाळू पेरणीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार तर काही टिकाणी तुऱक हजेरी लावली. त्यामुळे आंतरमशागतीची कामे कमी अधिक प्रमाणात झाली. मात्र. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून विभागात ‘ पावसाने धुमाकूळ घातला होता. सद्यस्थितीत पावसाने काही प्रमाणात ‘ उघडीप दिली असल्याने मशागतीच्या कामांना ‘ वेग <span;>आला आहे. पावसाची उघडीप मिळेल त्यानसार शेताची नांगरट, कुळवणी, फणपाळी आदी आंतरमशागतीची कामे शेतकन्यांनी उरकली आहेत. या वर्षीं परतीचा पाऊस चांगला पडणार, असे संकेत हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजा रब्बीची पेरणी उरकताना दिसत आहे.
खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी वर्गाला’ बी-बियाणे गोळा करण्यासाठी नातेवाइकांना विनवणी करावी लागत आहे. चाफळ येथील बियाणांच्या दकानात सर्व प्रकारचे बियाणे उपलब्ध आहेत. तरीही शेतकन्याची बियाणे हुडकण्यासाठी धांदल उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
चाफळसह विभागातील डोंगर-माथ्यावर भात शेतीस प्राधान्य आहे. याठिकाणी खडवी भाते मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र या वर्षी अ तिवृष्टीमुळे डोंगर भागात पेरणीच’झाली नसल्याने शेतकन्यांवर शेतात वाढलेल्या गवतावर तणनाशक फवारणी करीत शाळू पेरणीसाठी शेत तयार करण्याची वेळ आली आहे. गत चार ते पाच महिन्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक चणचण निर्माण झाली असून अनेक अडचर्णीचा सामना करावा लागत आहे.




