दामले प्रशालेत बाल दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
विद्यार्थी स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे/गुलटेकडी : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या
कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या संयोजनातून प्रशालेमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त “बाल दिन”साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर व पर्यवेक्षक श्री. अनिल तंवर सर यांच्या हस्ते चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसईकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बालदिनानिमित्त प्रशालेच्या प्रांगणामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. फॅन्सी ड्रेस व विविध वेशभूषा स्पर्धेत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रसैनिक, रमाबाई आंबेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक, लावण्यवती परी हु मै, कृष्णा प्रिय राधा, भाजीवाली यासारख्या अनेक दिग्गज व्यक्तींच्या
वेशभूषा परिधान करून त्यांचे सामाजिक, धार्मिक, राजकीय विचारांच्या सादरीकरणातून विद्यार्थी मनावरती विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्येक विद्यार्थी सादरीकरणाला प्रेक्षक विद्यार्थ्यांकडून टाळ्यांची दाद मिळत होती.

बालदिनानिमित्त आयोजित चमचा लिंबू स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बक्षिसांची लयलूट करत स्पर्धेचा आनंद लुटला. स्पर्धेचे परीक्षण सौ. मेधा हिंगे, अंजुषा कनुजे व सौ. शीतल ताकवले, निवेदन श्रीमती दीपा त्रिभुवन, सौ.संगीता पिसाळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




