क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निंबाळकरवाडी येथे कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या मयताची ओळख

१२ तासाचे आतमध्ये भारती विद्यापीठ पोलासांकडुन कौशल्यपुर्ण उलगडा

 

कात्रज/लोकसत्य न्यूज
       ११ आक्टोंबर रोजी १४.३० वा गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज पुणे येथे गवतामध्ये एका इसमाची बॉडी कुजलेल्या व आळ्या पडलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहूलकुमार बिलारे पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून पाहणी  केली असता मयत इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी खुन झाल्याची खात्री झाली. त्याच दरम्यान वरीष्टांनी देखील सदर घटनास्थठी भेट देवून मयत बॉडीचे नावाबाबत, तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
मा. वरिष्टांचे सुचना मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, तपास पथकाचे अंमलदारांनी मयत इसमाचे बाबत घटनास्थळाजवळील रहिवाशी यांचेकडे तपास केला असता त्यांचेकडुन मयत इसमाचे नाव सद्दाम ऊर्फ सलमान शेख, अंदाजे वय ३५ ते ४० व रा. गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले.

          त्यानंतर पोलीस अंमलदार विठ्ठल एकनाथ चिपाडे, वय ३८ वर्षे, हुहा पोलीस शिपाई बक्कल नंबर ८७२४, नेमणुक भारती विद्यापिठ पोलीस स्टेशन, पुणे शहर, राहणार फ्लॅट नंबर ३०८, स्केअर इन्फिनिटी, जुना पालखी रोड, देवाची उरळी, ता हवेली,  पूणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४६४|२०२५ भा. न्या. स. सन २०२३ चे कलम १०३(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार सागर बोरगे शोध घेत असताना त्यांना मयत इसमाचे मोबाईल नंबर  ‘प्राप्त झाला. त्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन त्यामधुन मिळालेल्या माहीतीवरुन, तसेच गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त झालेत्या बातमीवरुन मयत इसमास त्याचा मित्र विक्रम चैठा रोतिया, वय २३ वर्षे, धंदा मजुरी, रा. सध्या हरीभाऊ कचरे यांचे खोलीमध्ये भाड्याने सणसनगर, माळवाडी, निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे, मुळ रा. केमते, केराटोली, ठाणा रायडीग, केमते गुमला, झारखंड ८३५२३२ याने जिवे ठार मारले आहे, अशी माहीती मिळात्याने लागलीच त्याचा शोध घेतला असता तो गुजरवाडी भागात मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्ह्यात दिनांक १२/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा सपोनि शेंडे करीत आहेत.

             सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा पोलीस आयुकत सां, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठ्ठल चिपाडे, सौरभ वायदंडे. महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चोधरी यांच्या पयकाने केली आहे.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!