
राजगुरुनगर : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्य लिपीक अरविंद भारमळ यांना पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील सिंहगड रोडवरील निळू फुले सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना उल्हास पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे अध्यक्ष सुनील माने, सचिव शिवाजी खांडेकर, संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद गोरे, सुखदेव कंद , संजय धुमाळ, प्रसन्न कोतुळकर, संगीता पाटील, विकास दांगट उपस्थित होते.

खेड तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, प्राचार्या संध्या कांबळे, सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अरविंद भारमळ यांचे अभिनंदन केले आहे.




