महाराष्ट्रसामाजिक

‘पंचवदन’ ने ओबीसी समाजबांधव एकत्र आणला : दशरथ लोहार

प्रभु विश्वकर्मा प्रकटदिन उत्साहात साजरा

 

         चाफळ | प्रतिनिधी : पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था सन २०१७ पासन एकनिष्ट लोहार- सुतार समाजासाठी कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातन समाजातील एक एक बांधव जोडण्याचे काम केले जात असून, आज जिल्ह्यामधील गावागावातील ओबीसी बांधव एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे दशरथ लोहार यांनी केले

उंब्रज येथे पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था संस्थेच्या सातारा तालुका, सातारा शहर, कराड, पाटण उपशाखेच्यावतीने प्रभ विश्वकर्मा प्रकटदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावर्षीचा पंचवदन विश्वकर्मा समाजभूषण पुस्कार राष्ट्रती पुरस्कार प्रप्त अमोल लोहार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर पत्रकार उमेश सुतार (चाफळ), जयवंत सुतार (उंब्रज), शुभांगी लोहार (बांबवडे), शशिकांत लोहार (कोळे), सतीश लोहार (गारवड), उंब्रज , उमेश सुतार यांचा विशेष पुरस्का प्रदान काताना बाळकष्ण देसाई, समवेत संस्थेचे पदाधिकारी., रोहीत लोहार (पाडळोशी), प्रशांत सुतार (मालदन).. गोरख लोहार (ठोमसे) यांना विशेष परस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जनता बंकेचे संचालक बाळासाहेब लोहार होते. यावेळी बंचित बहुजन आघाडी, सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब सुतार, अँड. गणेश लोहार, प्राचार्य डॉ. बजरंग सुतार, डी.एम. सुतार, तात्यासाहेब लोहार. मुख्याध्यापक अधिकराव सुतार, भाजपाचे सातारा जिल्हा सरचिटणीस महें्र कदम, अनिल लोहार, शशिकांत सुतार, निलेश लोहार, तुकाराम सुतार यांची प्रमुख उपस्थिती ‘ होती.

अमोल लोहार म्हणाले, सातारा जिल्ह्यात अद्यापही ओबीसी समाज बांधव विखुरलेला आहे. या सवांनी एकविचाराने एकत्र येणे गरजेचे आहे. समाज बांधवांना एकत्र आणण्यासार्ट पंचवदन संस्थेने पुढाकार घेतला असून समाज बांधवांनी एक्विचाराने एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

        यावेळी समाजबांधवांच्या गुणवंत मुलांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आप्पासाहेब सुतार, सुत्रंचालन दादासो सुतार व सागर लोहार यांनी केले.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!