रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या वतीने मुख्याध्यापका व अधिकारी कार्यशाळा
लतीफ शाह

पुणे, दि. १५ : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी ‘नवे क्षितिज’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
शिक्षणाचे खरे उद्दिष्ट, जे मुलांचा सर्वांगीण विकास आहे, ते साध्य करण्यासाठी येणाऱ्या आव्हानांवर आणि अडचणींवर मात करण्यासाठी मुख्याध्यापकांना प्रोत्साहन देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

पुण्याच्या आय.एल.एस.लॉ कॉलेज रस्त्यावरील दामले हॉलमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत पुणे जिल्ह्यातील ४० मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळेचे प्रशिक्षक न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे माजी प्राचार्य नागेश मोने व ज्ञान नी दान या संस्थेचे संस्थापक रवी बाविस्कर होते.

पहिल्या सत्रात श्री. नागेश मोने यांनी मर्यादित साधनांसारख्या अनेक आव्हानांवर मात करून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राचार्य म्हणून केलेल्या कामाचा अनुभव सांगितला. शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट मुलांचा सर्वांगीण विकास आहे. शिक्षण केवळ वर्ग आणि अभ्यासक्रमापुरते मर्यादित ठेवल्यामुळे आणि शिस्तीच्या अयोग्य पद्धती वापरल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य होत नाही. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ध्येय साध्य करू शकतात.

श्री. रवी बाविस्कर यांनी दुसऱ्या सत्रात विविध कृतींद्वारे मुख्याध्यापकांना कल्पनाशक्ती, समस्या निवारण, सांघिक कार्य, ऐकणे, सहानुभूती इत्यादी कौशल्यांचा वापर करून अनेक समस्या सोडवता येतात. आव्हानांना छोट्या गटांमध्ये चर्चा करून उपाय शोधता येतात.

कार्यशाळेचा समारोप विविध आकारांच्या आणि रंगांच्या पानांच्या मदतीने कोणत्याही प्राण्याचे चित्र बनवण्याच्या मजेदार आणि सर्जनशील गट कृतीने झाला.

महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगरचे लतीफ शाह, भैरवनाथ विद्यालय किवळेचे लतीफ शेख, शिवाजी विद्यामंदिर चाकणचे राजेद्र खरमाटे यांनी कृतिसत्रात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे संयोजन रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्ष माधवी चौहान, रोटेरियन्स मुकुंद चिपळूणकर, मोहन छत्रे, पद्मा सहाणे यांनी केले.




