
चाफळ/उमेश सुतार : जाधववाडी. ता. पाटण गावचे सपत्र भारतीय स्थलसेनेतन सेवानिवृत्त झालेले सैनिक रणजित गुलाबराव गुजर यांचे गावामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या जीपमधून गुजर यांची गावातून सहकुटुंब मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे देशसेवेत आपले आयुष्य खर्चीं घातलेल्या जवानाचा उचित सन्मान झाल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. १२ ऑगस्ट २००६ साली कोल्हापूरू बीआरओमधून सातारा येथे भरती झालेले रणजित गुजर हे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथून हवालदार या पदावर कार्यरत असताना सेवानिव्रत्त झाले. दिल्ली , जम्मू- काश्मीर, अरणाचल प्रदेश, सिक्कीम, नाशिक या ठिकाणी ३६ मराठा मीडयम रेजिमेंटमध्ये गुजर यांनी आपली सेवा बजावली आहे.
यावेळी कुटूंबासह गुजर यांना फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये बसवण्यात आले दोने पाठीमागे चार ते पाच गाड्यांच्या ताफ्यासह माज सैनिक रणजित गुजर यांनी गावात प्रवेश केला त्यानकत संपूर्ण गावातून त्यांची मोठ्या जल्लोषात मिखणूक काढण्यात आली मिखणुकीदरम्यान गावातील महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षणही केले.




