भरवस्तीत घुसून बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
जाधववाडी येथील यटना, तीन शेल्यांना जागीच मारले, एका शेळीला पळवून नेले, गावकरी भयभीत

चाफळ/उमेश सुतार : प्रदीर्घ विश्रांतीनंतर चाफळ विभागात पुन्हा एकदा बिबट्याचे पाळीव जनावरावरील हल्ल्याचे सत्र सरू झाले आहे. जाधववाडी, ता. पाटण येथे शक्रवारी मध्यरात्री घराशेजारी असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबटयाने हल्ला करत तीन शेळ्यांना जागीच ठार मारले तर एका शेळीस पळवून नेल्याची घटना घडली. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गावची प्राथमिक शाळा गावाबाहेर अर्ध्या ते एक कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे लहान मुले चालतच शाळेला जात असतात. बिबट्याचा वावर वाढल्यामळे पालक वर्ग चांगलाच धास्तावला आहे. वनविभागाने सदर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा असे मत जाधववाडीचे विजय पवार यांनी मांडले आहे.
जाधववाडी येथील समीर रामचंद्र जाधव यांचे घरानजीक जनावरांचे शेड आहे, या शेडमध्ये चार शेळ्या बांधलेल्या होत्या. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जाधव यांनी शेडमधील जनावरांना चारा / पाणी देऊन ते झोपी गेले. शनिवारी सकाळी जाधव कुटंबीय शेडमध्ये गेले असता त्यांना चार पैकी तीन शेव्या जागीच मृत अवस्थेत आढळून आल्या तर एक शेळी गायब असल्याचे दिसून आले, जनावरांच्या शेडच्या आसपास पाहिले असता बिबटयाच्या पायाचे ठसे आढळून आले. या प्रकारामुळे जाधव कुटुंबीय भयभीत झाले आहे,
बिबट्याचे भरवस्तीत घुसून हल्ला करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमधून प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.




