
पुणे-गुलटेकडी/प्रतिनिधी : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या संकल्पनेतून श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त “पुस्तक दहीहंडी ” उत्सव प्रशालेच्या भव्य प्रांगणात शिक्षक -विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांनी बालगोविंदांचे पथकाचे स्वागत करत उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशालेच्या वतीने विद्यार्थी वाढदिवसानिमित्त प्रशाला ग्रंथालयाला पुस्तक भेट देऊन अजरामर आठवणीतून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या पुस्तक दहीहंडीत राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, संशोधक व विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी यांचे चरित्रात्मक साहित्य दर्शविण्यात आले होते.
दहीहंडी उत्सवानिमित्त प्रशालेमध्ये श्रीकृष्ण महिमा व जीवनावरील प्रसंगांचे रेखाटन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कल्पक चित्रकलेतून श्रीकृष्ण जीवनातील प्रसंग रेखाटले. दहीहंडीनंतर सर्व विद्यार्थ्यांना लाडू व चिवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय हेगडकर सर यांनी केले, तर संयोजन श्री. प्रताप सर्जेराव सर यांनी केले. उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सहभाग लाभला.




