
देहू/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन नगरपरिषद व देहू नगर पंचायत यांच्या वतीने हर घर तिरंगा २०२५ अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत चित्रकला, रांगोळी व वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या.
या प्रसंगी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण १५ ऑगस्ट २०२५ रोजी नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री. चेतन कोंडे, उपनगराध्यक्षा सौ. प्रियांका मोरे, नगराध्यक्ष सौ. पुजा दिवटे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देहूतील नागरिक, विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बक्षीस पात्र विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेश या प्रसंगी देण्यात आले. या स्पर्धेत जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूलने उल्लेखनीय यश मिळविले.
स्पर्धा निकाल, चित्रकला स्पर्धा बक्षीस विवरण :-
१ ते ४ गट
१) वेद सुदत्त जाधव
४ थी, इ जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
२) स्वरा समाधान लोंढे
४ थी, अ जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
४) प्रेम संतोष सोनोने
४ थी, जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
उत्तेजनार्थ
५) संस्कृती सागर पाटील
४ थी, अ जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
उत्तेजनार्थ
५ ते ७ वी गट
१) शौर्य आर चौगुले
७ वी, ड जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
२) शिवा सुनी प्रजापती
७ वी जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
३) अदिती सत्यवान वाघमोडे
७ वी जगद्गुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
वक्तृत्त्व स्पर्धा निकाल, लहान गट
२) स्वरा जालिंदर बंदर जाधव
४ थी जगद्गुरु इंग्लिश स्कूल
३) दृष्टी दत्तात्रय मंगोडे
४ थी जगद्गुरु इंग्लिश स्कूल
देहू नगरपंचायत देहू वकृत्व स्पर्धा (मोठा गट)
१) देवा सुनील प्रजापती
जगद्गुरु इंग्लिश स्कूल
६) सोहम रा निकम
जगद्गुरु इंग्लिश स्कूल देहू.
सर्व विजेत्यांचे संस्थेचे पदाधिकारी श्री. व सौ. साकोरे व मुख्याध्यापिका तसेच वर्गशिक्षक यांनी कौतुक व अभिनंदन केले.



