
पुणे/गुलटेकडी : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या व्यवस्थापन व संयोजनातून “15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन ” उत्सव प्रशालेच्या भव्य प्रांगणात महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यवाह मा. श्री. रोहनजी दामले यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहणाने उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत आगाशे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री. सोपान कांगणे सर, कटारिया हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक श्री.संजय शेंडगे सर,सौ. कमलाबाई दामले प्राथमिक विद्यामंदिराच्या मा. मुख्याध्यापिका सौ. आरती गायकवाड, महाराष्ट्रीय मंडळाच्या इंग्लिश प्राइमरी स्कूलच्या मा. मुख्याध्यापिका सौ. अदिती लोमटे तसेच महाराष्ट्रीय मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आगाशे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संचालन करून ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांनी प्रास्तविकातून भारतीय स्वातंत्र्य समरांमध्ये बलिदान केलेल्या क्रांतिकारकांचे स्मरण करत सर्वधर्मसमभाव, राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती प्रज्वलित करत सर्व उपस्थितांचे आभार मानत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी दामले प्रशालेच्या शिक्षिका प्रज्ञा इंगळे मॅडम व विद्यार्थ्यांनी समरगीत गायनातून उपस्थितांची मने जिंकली. या राष्ट्रीय उत्सवात उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रशालेची ज्येष्ठ शिक्षक श्री. आश्रू बनकर सर यांनी करून दिला.तसेच विद्यार्थी चि. कौस्तुभ डिंबळे याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त पसायदानाचे गायन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय हेगडकर सर यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक श्री. अनिल तंवर सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सहभाग लाभला.




