श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिराचा “स्वातंत्र्य दिन” कार्यक्रम संपन्न
लोकसत्य न्यूज

पिंपरी चिंचवड/आकुर्डी : “नवनगर शिक्षण मंडळ”, आकुर्डी संचलित “श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर”, आकुर्डी या शाळेचा “स्वातंत्र्य दिन” १५ ऑगस्ट कार्यक्रम नागेश्वर मित्र मंडळ, आकुर्डी गावठाण येथे मोठ्या उत्साहात, आकुर्डी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रथमता सर्व विद्यार्थ्यांची आकुर्डी गावामध्ये प्रभात फेरी निघाली. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते निखिल दळवी, माजी सैनिक औदुंबर गुजर, नानासाहेब ठोंबरे, रघुनाथ काळभोर, आबा जाधव, गोविंदराव शिंदे तसेच सर्व नागेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक माननीय गोविंदरावजी दाभाडे सर, संस्थेचे संचालक अभिषेक दाभाडे, मुख्याध्यापक राजू माळे व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते. ध्वजारोहण माननीय गोविंदरावजी दाभाडे व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांची भाषणे तसेच समूहगीत, राष्ट्रगीत, ध्वजगीत, ध्वज प्रतिज्ञा झाले. या कार्यक्रमात विशेषता “सेकंड महाराष्ट्र एनसीसी बटालियन” यांचे संचलन गणेश भोने व धैर्यशील लावंड यांच्या मार्गदर्शनात झाला. एनसीसीचे संचलन पाहण्यासाठी आकुर्डी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या रेडकर, निवेदन नंदा पाटील यांनी केले तर आभार सुवासिनी वैद्य यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर नागेश्वर मित्र मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.




