बी. के. इंग्लिश मिडीयम स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोकसत्य न्यूज

पाल/कराड : येथील बी.के. इंग्लिश मीडियम स्कृलमध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढून ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या यशाबहल विविध बक्षिसांचे वितरण करून गौरव करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन हजार रुपये शिष्यवृत्ती व मार्गदर्शक शिक्षकांनाही बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिगाडे पाटील सायन्स कॉलेजचे संस्थापक लिगाडे होते. प्रमख पाहणे म्हणून पीएसआय सागर खबाले-पाटील व एपीआय कचरे, संस्थेचे संस्थापक संजय काळभोर, वसंतराव मोहिते, सिद्धी ढापरे, चेअरमन गजेंद्र काळभोर , सचिव रघुनाथ पवार, यश ढापरे व संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता पाचवीतील श्रीतेज कणसे आणि स्वरा माने हे विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले. इयत्ता आठवीतून प्रथमेश देशमुख, साहिल पन्हाळे, गौख राजणे, आर्या जाधव आणि वेदांत होणे या विद्यार्थ्यानी उल्लेखनीय कामगिरी केली. पाचवीचा निकाल ७५ टक्के आणि आठवीचा निकाल ८३ टक्के इतका लागला.
या यशामागे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक रोहित यादव, वर्षा बर्गे, दिपाली जगदाळे, गौरी सुकटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका अनिता खोचरे, उपमुख्याध्यापिका सविता काळभोर व व्यवस्थापक ज्ञानेश्वर यादव यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.




