निर्भया पथकाने शाळा- कॉलेज परिसरात गस्त वाढवावी
संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलिसांकडे निवेदन

सातारा/प्रतिनिधी : शहरातील शाळा आणि कॉलेज परिसरात वाढत चाललेल्या सडकछाप टोळक्यांच्या त्रासामळे विद्यार्थीं, विशेषतः विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिकडेच करंजे परिसरात घडलेल्या प्रकारामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाने शाळा- कॉलेज परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून शाळा- कॉलेज परिसरात गैरप्रकार वाढत आहेत. मुलांची टोळकी अनेक कॉलेजच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेली असतात. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी निर्भया पथकाची गस्त वाढवणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख रफीक शेख, उज्वला निकम, दशरथ निकम, संघटक महेश गराटे, सचिव महेबूब पठाण, अमोल नलावडे, इम्रान कच्छी. संकेत भोईटे, विकास शेडगे, नाझिम बागवान उपस्थित होते




