
चाकण/प्रतिनिधी : येथील मुटकेवाडी ते मेदनकरवाडी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या काही दिवसापासून चालू असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत याला कारणीभूत कोण? प्रशासन की ग्रामपंचायत अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
गेली बरेच दिवसापासून चाललेल्या या रस्त्याच्या कामाला आणखीन किती दिवस लागणार? शिवाय या कामामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून वाहनांची दाट वर्दळ होत असल्याचे दिसते.
रस्ता अरुंद असून या रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ होत असल्याने यात ग्रामपंचायतचा आंधळा कारभार चालू असल्याची चर्चा समस्त नागरिकांमधून होत आहे. तरी संबंधितांनी या कामाकडे लक्ष घालून नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाला आळा घालण्याचे काम करावे अशी विनंती जनतेतून केली जात आहे.




