दाढोली ग्रामपंचायत मार्फत विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप
लोकसत्य न्यूज

चाफळ/उमेश सुतार : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे या दृष्टीने शाळांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे मुलांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन सरपंच विनोद डांगे यांनी केले.
दाढोली, तालुका पाटण येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दाढोली, मसुगडेवाडी, महाबळवाडी शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी केंद्रप्रमुख सुरेखा जाधव, उमेश सुतार, ग्रामसेवक रावते, मुख्याध्यापिका शितल बाबर, तुकाराम डांगे, लक्ष्मण डांगे, अंकुश डांगे, आबासो धावडेकर, अजय डांगे, शरद मराठे, विठ्ठल शिंदे, संजय वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शितल बाबर म्हणाल्या, ग्रामपंचायतीचे शाळांच्या भौतिक विकासात मोठे योगदान आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीचे वतीने दाढोली, मसुकडेवाडी व महाबळवाडी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांच्या सहकार्याने शाळांमधील अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत.
यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार उमेश सुतार यांचा ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजय वाघेरे यांनी आभार मानले.



