पाटण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विलासराव माने तर उपाध्यक्षपदी उमेश सुतार यांची निवड
लोकसत्य न्यूज

पाटण/उमेश सुतार : पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच पार पडली अध्यक्षपदी विलासराव माने तर उपाध्यक्षपदी सुरेशराव संकपाळ व उमेश सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष श्री विलासराव माने यांनी येत्या वर्षभरात पत्रकार संघाच्या वतीने चांगले उपक्रम राबवून संघाने जो विश्वास माझ्यावरती दाखवला आहे तो विश्वास मी सार्थक करेन, या निवडीमुळे माझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढली आहे त्यामुळे विभागातील सर्व पत्रकारांना एकत्रित घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सचिव भगवंत लोहार यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मागील बैठकीबाबत आढावा दिला. माजी अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी वर्षभरात पाटण तालुका पत्रकार संघाने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी जेष्ठ सदस्य राजेंद्र लोंढे यांनी मार्गदर्शन केले. राज्य प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार विलासराव चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी म्हणून राजकुमार साळुंखे, कार्यकारणीमध्ये पाटण विभाग प्रमुख प्रकाश कांबळे, मोरगिरी विभाग प्रमुख संदेश बनसोडे, तारळे विभाग प्रमुख एकनाथ माळी यांच्या निवडी करण्यात आल्या.
प्रेस फोटोग्राफर प्रमुख पदी सुधीर लोहार, सचिन पोद्दार, खाशाबा चव्हाण, नानासाहेब पवार यांची निवड करण्यात आली. सदरच्या बैठकीत पाटण तालुक्यातील पत्रकार संघाचे सर्व सदस्य व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.



