ढेबेवाडी/इलाही शेख : तळमावले येथील शेतकरी व छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची अर्थवाहिनी असलेल्या मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वार्षिक कॅलेंडरचे प्रकाशन ढेबेवाडी येथील शाखेमध्ये उत्साहात पार पडले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन श्री अनिल शिंदे साहेब, व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर, उपव्यवस्थापक करण शिंदे, सचिव ओंकार शिंदे, संचालक शिवराम पवार, उद्योजक राजूशेठ चव्हाण, ढेबेवाडी पतसंस्थेचे शाखाप्रमुख श्रीमती शोभा वीर, सौ. सविता संकपाळ, कॅशियर सुहास पाटील, पिग्मी एजंट सूर्यकांत काळे, कर्मचारी अनिकेत नलवडे, सौ वृषाली देसाई, बशीरभाई मुरसल तसेच गावातील व परिसरातील शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ढेबेवाडी शाखेच्या व्यवस्थापिका श्रीमती शोभा वीर यांनी प्रास्ताविक केले व आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे आभार मानले.
"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील.
आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता.
raphik.261175@gmail.com