ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणुसकी अजून जिवंत आहे..

लोकसत्य न्यूज

       कराड/प्रतिनिधी : गोटे ता. कराड गावचे रहिवाशी अधिकराव दिनकर पवार हे आपले कुटुंबासमवेत हरतालिका मुर्ती विसर्जन करणेसाठी प्रितीसंगम घाट, कराड येथे गेले असता हरतालिका मुर्ती विसर्जन करतेवेळी 8,30,000/- रु. किंमतीचा अंदाजे 10 तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार त्यांचेकडुन चुकून विसर्जन झाला होता. सदरचा राणीहार प्रितीसंगम घाट येथे भंगार गोळा करणा-या महिला नुरजहाँ फकीर रा. शिवाजी स्टेडीयमजवळ, कराड यांना सापडलेला होता. त्यानंतर नुरजहाँ फकीर यांनी सदरचा सोन्याचा राणीहार त्यांचे ओळखीचे सोनार सुपर ज्वेलर्सचे मालक निसार सय्यद यांचेकडे आणून दिला व त्यानंतर निसार सय्यद यांनी ही घटना माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना कळवली.
      निसार सय्यद व सिद्धार्थ थोरवडे यांनी त्या महिलेस तो हार तुम्हाला पाहिजे का असे विचारले असता सदर महिलेने तो ज्यांचा असेल त्यांना द्यावा. असे प्रामाणिकपणे सुचित केले. श्री सिद्धार्थ थोरवडे, निसार सय्यद त्या महिलेसोबत येऊन सदरचा 10 तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार कराड शहर पोलीस स्टेशन मध्ये आणुन हजर केला. पोलिसांनी अधिकराव दिनकर पवार यांना बोलावुन घेवुन सदरचा सोन्याचा राणीहार ओळख पटवुन त्यांचे ताब्यात दिलेला आहे. तसेच नुरजहाँ फकीर रा. शिवाजी स्टेडीयमजवळ कराड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना 10000/- रु. रोख रक्कम व सोबत असणाऱ्या महिलांना साडी देवुन यथोचित सत्कार करणेत आलेला आहे.
तसेच सदर महिला दुकानात आल्यानंतर सदर हार सोन्याचा आहे हे महिलेला सांगितले व ही बाब पोलिसांना सुद्धा प्रामाणिकपणे कळवल्याबद्दल सुपर ज्वेलर्सचे मालक निसार सय्यद यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

     सदरवेळी गुन्हे प्रकटीकरणचे श्री गणेश कड साहेब, माजी नगरसेवक श्री सिद्धार्थ थोरवडे , माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते श्री मुकुंद चरेगावकर , श्री समाधान चव्हाण व आदिमाया मंडळाचे श्री किरण मुळे व मा नगरसेवक गंगाधर जाधव, माजी नगरसेवक श्री शिवाजी पवार तात्या व पोलीस अधिकारी श्री तारू साहेब, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. प्रामाणिकपणाबद्दल नुरजहा फकीर व सुपर ज्वेलरचे मालक निसार सय्यद यांचे मनापासून आभार.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. 9021132121 raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!