ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सह्याद्री कारखान्याच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू द्या अन्यथा निदर्शन आंदोलन : वसिम इनामदार  

Loksatya News

       कराड/प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मागील २०२३-२४ गळीप हंगामातील ऊसाला ३५७१ रु. टनाला उच्चांक दर जाहीर केला असून राज्यात एफ. आर. पी. पेक्षा ६९७ रुपये ऊसदर देणारा सोमेश्वर कारखाना आहे. आपल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची त्यांच्या पेक्षा चांगली रिकवरी १२.२२ पेक्षा जास्त आहे. कारखाना शेतकऱ्यांना मागील हंगामात २०२३-२४ (५००/- रु.) दुसरा हप्ता प्रती टनाप्रमाणे मिळाला पाहिजे व चालू हंगाम २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये प्रति टन रु. ५०००/- प्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळावा. तसेच २०१८-२०१९ मध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाण्यानी शेतकऱ्यांला ३२२८ प्रति टन इतका उच्चांक दर जाहीर केला होता. त्या काळामध्ये विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे दर जाहीर करण्यात आले असावेत, कारण की निवडणुक झाल्या नंतर आपल्या कारखान्याने मागील चार वर्षामध्ये एफ.आर.पी. च्या वर दर शेतकऱ्यांना दिल्याचे निदर्शनास आलेले नाही. असे निरीक्षण वसिम इनामदार अध्यक्ष,कराड उत्तर, शेतकरी संघटना यांनी मांडले आहे.

      सह्याद्री सहकारी साखर कारखाना फक्त सभासदांना वार्षिक सभेची नोटीस काढत आहे. परंतु बिगर सभासद शेतकऱ्यांचा ऊस कारखाना घेत असतो. वार्षिक मिटींगला ज्या शेतक-यांचा ऊस कारखान्याला आलेला आहे, त्या शेतकऱ्याला आपल्या कारखान्यामध्ये वार्षिक सभेमध्ये बोलण्यास संधी मिळावी. व हे रास्त आहे की, तोडणी, वाहतुकीचे पैसे कोणत्याही शेतकऱ्यांनी देऊ नये असे आपल्या कारखान्याचे आधिकारी वारंवार बोलत असतात. परंतु सत्य आहे की, तोडणी वाहतुकीचे पैसे त्या शेतकऱ्याने न दिल्या शिवाय टोळी, मुकादम व चीट बॉय वेळेवर शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड मिळत नसून शेतकऱ्यांची बेकायदेशीरपणे चाललेली लुट थांबली पाहिजे असे ठोस निर्णय कारखान्याने घेवून सह्याद्री सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचा व सभासदांचा आहे. वैयक्तीक एखाद्याची राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही, याचे भान असावे असा आरोप ही वसिम इनामदार यांनी माध्यमांसमोर बोलताना केला.

सर्वसामान्य शेतकरी व सभासदांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यास संधी मिळावी म्हणून वसिम इनामदार यांनी कारखाना प्रशासनाला विनंती केली आहे व कारखाना प्रशासन ती लोकशाही मार्गाने पूर्ण करतील यात शंका नाही. कारखान्याचे सभासद असणारे सुहास शामराव पाटील, लक्ष्मण गोविंद मोरे, बाळकृष्ण रामचंद्र उबाळे, बबन रामचंद्र दिघे, विनायक राजाराम भोसले, तायर कासम इनामदार यांना प्रश्न मांडण्यास मिळावेत. ही अपेक्षा सभासदांना कारखाना प्रशासनाकडून आहे. पण जर कारखाना प्रशासन कायद्याप्रमाणे तंतोतंत पालन करुन उत्तर देत नसतील, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, आम्ही ही शेतकऱ्यांची मुले आहोत असा निर्वानिचा इशारा ही वसिम इनामदार यांनी दिला.

येणाऱ्या सहयाद्री कारखान्याच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू न दिल्यास त्याच दिवशी कारखान्याच्या आवारात शेतकरी संघटना कराड उत्तरच्या वतीने लोकशाही मार्गाने निदर्शन आंदोलन करण्यात येईल. त्याची पुर्ण जबाबदारी कारखाना प्रशासन यांची राहील. याची गांभिर्याने दखल घेण्यात यावी.असा इशारा शेतकरी संघटना कराड उत्तरचे अध्यक्ष वसिम इनामदार यांनी दिला.

      यावेळी उपस्थित पदाधिकारी सुहास शामराव पाटील, सयाजी उबाळे, मारुती यादव, राजेंद्र यादव, बबन दिघे, लक्ष्मण मोरे, पर्वती तावरे, महिपती गाडगे, अमीर मुल्ला, संतोष महामुलकर, इनायतुल्ला इनामदार, हनुमंत मोरे, लालातात्या व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. 9021132121 raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!