ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक

अकल्पित भावनात श्रीकृष्ण जन्मकाळ साजरा

लोकसत्य न्यूज

चाफळ/उमेश सुतार : येथील श्रीराम देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक बा.मा. सुतार यांचे अकल्पित भावनात शतकोत्तरी श्रीकृष्ण जयंती उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या पाच पिढ्यापासून सुरू असलेल्या या श्रीकृष्ण जयंती सोहळ्याचा समारंभ नारळी पौर्णिमे दिवशी विना पूजन व कलश पूजनाने करण्यात आला. हरिपाठ झाल्यानंतर रात्री श्रीराम समर्थ भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.

सोमवारी सोहळ्याच्या मुख्य दिवशी रात्री तात्यासाहेब नलावडे, दत्तात्रय सुतार, राजेंद्र सुतार, ऋषिकेश सुतार यांनी भजनाचा कार्यक्रम पार पडला तर रात्री सव्वाबारा वाजता योगेश सुतार यांचे हस्ते श्रीकृष्ण महापूजा करण्यात आली. यावेळेस श्रीकृष्ण जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी पाळणा गीते गायली, मंगळवारी दुपारी चार वाजता अकल्पित भवन मधून दिंडी सोहळा काढण्यात आला.

चौकात बांधलेली दहीहंडी युवकांनी फोडली. हा सोळा यशस्वी करण्यासाठी महेश सुतार, धनंजय सुतार, श्रावण सुतार, डीएम सुतार, वैभव सुतार यांनी परिश्रम घेतले.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. 9021132121 raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!