ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक
कात्रज कोंढवा ब्रिजवरील एक्सीडेंटचे वाढते प्रमाण
कात्रज /अब्दुल रहीम शेख : कात्रज कोंढवा ब्रिजवर रिक्षावाल्यांच्या निष्काजीपणामुळे आणि वेडीवाकडी रिक्षा पार्किंग केल्याने एक्सीडेंट होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून म्हटले जात आहे.
ब्रिजवरील रस्ता हा घसरडा झाल्याने वाहनांचे एक्सीडेंटचे प्रमाण वाढत असून आणि रस्त्याला वळण असल्यामुळे सुद्धा एक्सीडेंट होत असल्याचे निदर्शनात आले आहे, तरी संबंधितांनी यावर लवकरात लवकर पर्याय काढावा असे जनतेतून म्हटले जात आहे.
कात्रज कोंढवा ब्रिज हा वाहतुकीसाठी जीवघेणा ब्रिज बनला आहे. या रस्त्यावर कात्रज चौकाच्या कॉर्नरला रिक्षा चालकांचे पार्किंग होत असते आणि यांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. कात्रज चौकातून कोंढव्याकडे जाण्यासाठी वेगाने आलेल्या गाडीला ताबा घेत न येत असल्यामुळे एक्सीडेंट होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून म्हटले जात आहे.





