ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक

चाफळ बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था

रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट बस स्थानकात; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

      चाफळ/उमेश सुतार : दक्षिण महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या चाफळ येथील बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट बस स्थानकात घुसत असल्याने बस स्थानकात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे “बस स्थानक की तळे, काहीच न कळे”, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

चाफळ बस स्थानकात दुर्गंधीयुक्त साचत असलेल्या पाण्याचा नाहक त्रास होत असून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे कोणीही यावे आणि बस स्थानकात काहीही करावे अशी अवस्था निर्माण झाली आहे. सातारा विभाग नियंत्रक नेमकं कधी लक्ष देणारअसा संत अशी पर्यटन आणि ग्रामस्थांकडून विसरला जात आहे.

विभागातील 35 ते 40 गावचे बाजारपेठेचे चाफळ हे मुख्य ठिकाण आहेत. हजारो शालेय विद्यार्थी पर्यटक आणि प्रवाशांची रोज रेलचेल या बसस्थानकात सुरू असते. सध्या बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे इमारत जीर्ण झाल्यामुळे ती कधी कोसळेल हे सांगता येत नाही. परिसरात जोरदार पडत असलेल्या पावसाचे पाणी थेट बस स्थानकात येत असल्याने पाण्याचे तळेच तयार झाले असून प्रवाशांना मात्र या पाण्यातच उभे राहून एसटीची वाट बघत उभे राहावे लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली असून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बस स्थानकाची झालेल्या अवस्थेची पाटण आगार प्रमुखांनी पाहणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. बस स्थानकात घुसणारे रस्त्यावरील पावसाचे पाणी थांबवण्याच्या दृष्टीने सातारा विभाग नियंत्रकांनी तात्पुरती व्यवस्था करून बस स्थानकात शिरणारे पावसाचे पाणी थांबवण्याच्या संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

नवीन बस स्थानकाला ‘हिरवा कंदील
चाफळ येथे सध्या तीन फलाटची इमारत आहे. त्यामध्येच कॅन्टींग व ऑफिसची व्यवस्था आहे. ही इमारत फार जुनी झाली आहे. या ठिकाणी पाच फलाटचे बस स्थानक करण्याच्या प्रस्तावाला वरिष्ठ कार्यालयाकडून “हिरवा कंदील” मिळाला असून चाफळ या ठिकाणी लवकरात लवकर नवे बस स्थानक होणार असल्याचे वृत्त आहे.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. 9021132121 raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!