महाराष्ट्रताज्या घडामोडी

पावसानं घातलं थैमान… सगळीकडे केलं पाणीच पाणी….

लोकसत्य न्यूज

      पुणे (लोकसत्य न्यूज) : हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पावसाने दोन दिवसांच्या जोराने पुणे जिल्ह्यात चांगलेच झोडपले असून सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले आहे.
यावेळी पावसाने चांगलेच थैमान घातले असून जिकडेतिकडे, कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडला असून शेतकरी राजा खुष झाला आहे. मोशी, चाकण, पिंपरी, चिंचवड या ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपले असून रस्त्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणीसाठा जमला आहे. ज्यामुळे वाहनांना येजा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामध्ये पाणीसाठा होत असून टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहने या खड्ड्यातून नकळत जाताच येथे अडकून बसत आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा जोरदार पाऊस पडत असल्याने आणि रस्त्यावर सुद्धा खडी उसकटून निघाली आहे.
जिल्ह्यातील जवळजवळ सगळीच धरणे तुडुंब भरली असून ओवर फ्लो होवून वाहत आहेत. संततदार पडत असलेल्या पावसामुळे रस्ता जाम होण्याचे प्रमाण वाढले असून ठिकठिकाणी वाहनांची वर्दळ होत चालली आहे.
      हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मा डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
      खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल घराबाहेर पडावे असे आवाहन मा जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.
दक्षिण पुणे येथील ऐतिहासिक कालीन असलेला कात्रज तलाव सुद्धा पावसाने तुडुंब भरून वाहत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. 9021132121 raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!