जिल्हाधिकारीमार्फत आज पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे/लोकसत्य न्यूज : हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज दिनांक 9 जुलै रोजी हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा दिला असून पुणे जिल्ह्यातील सर्व सरकारी, व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विभागीय उपसंचालक मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांक सिउर्स माध्यमिक संकिर्ण 2022 7077 दि. 13.7.2022 अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचीनुसार जिल्ह्यातील त्या त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2019/प्र.क्र199/एसडी2 दि.2/8/2019 च्या शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 8 जुलै 2024 रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा, रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. या सर्व बाबींचे अवलोकन करता पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालय यांना दिनांक 9 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबईच्या शासन परिपत्रकांवर प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यान्वये पुणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, सर्व महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 9 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करीत आहे. तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाचे आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे तसेच उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असेही पुणे जिल्हाधिकारी डॉ . सुहास दिवसे यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे.




