निसार फाउंडेशनतर्फे लाडकी बहिण योजना फॉर्म भरणे व आधार कार्ड अपडेट आणि बाल आधार कार्यशाळा
लोकसत्य न्यूज

पुणे/लोकसत्य न्यूज : निसार फाउंडेशन तर्फे एक दिवस लाडकी बहिण योजना फॉर्म भरणे, आधार कार्ड बनविणे, दुरुस्ती करणे तसेच लहान मुलांचें आधार बनविणे असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले, त्याच बरोबर पोस्टाचे विविध प्रकारचे खाती उघडण्यात आले.
ह्या कार्यक्रमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास 437 लोकांनी याचा लाभ घेतला. त्यात 51 DBT अकाऊंट, 96 लहान मुलांचे आधार, 92 आधरला मोबाईल लिंक करणे, 134 लाडकी बहिण योजना फॉर्म भरणे तसेच उर्वरित आधार कार्ड अपडेट करण्यात आले.
श्री गणेश सुतार, पोस्ट मास्तर कोंढवा खुर्द, पुणे व त्यांचे सहयोगीनी कार्यक्रम पार पाडण्यात मोलाचा वाटा उचलला. श्री चाँदभाई बळबट्टी व सुफियान शेख सर यांनीही हातभार लावला .
ह्या प्रकारचे मुलांना व पालकांनासाठी विविध प्रकारे कार्यक्रम व सेमिनार वेळोवेळी घेणार असं निसार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हफीज शेख यांनी सांगितले.



