
चाफळ/उमेश सुतार : सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेोषतः दुर्गम व डौंगराळ अशा पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये विवाहयोग्य मुलामुलीची लग्ने रखडल्याने एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्मांण झाला आहे. विशेपतः लग्रासाटी मुली न मिळाल्याने मुलांची लग्ने होत नाहीत, याचा थेट परिणाम आता शाळांच्या पटसंखयेवर होऊ लागला आहे.
पहिलीत नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली असून, काही शाळांमध्ये तर पटसंख्येअभावी काही वर्गच गायब झाले असल्याचे चित्र दिसू लागल्याने शिक्षण क्षेत्रातही आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहै.
पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक छोटया- मोठ्या महसुली गावांमध्येसुद्धा समस्या मोट्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि काही प्रमाणात लिंग गणोत्तरातील असंतुलनामुळे विवाहयोग्य मुलीची उपलब्धता कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक गावांमध्ये तरुण मुलांची लग्ने वेळेवर होत नाहींत. ही एक गंभीर समस्या बनून राहिली आहे. याचे दरगामी परिणाम आता शिक्षण व्यवस्थेवरही झाले असल्याचे प्रर्यायाने जाणवते आहे.
मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यींच्या संख्येत लक्षणीय घट होत गेल्याचे दिसून येते. ज्या घरात तरुण मुलांची लग्ने झालेली नाहीत, त्या घरांमध्ये साहजिकच नवीन पिढी जन्माला येत नाही. यामुकळे गावातील लहान मुलांची संख्या कमी होत आहे. ज्याचा थेट परिणाम शाळाच्या पटसंख्येवर होत आहे. अनेक शाळांमध्ये नवीन प्रवेश जवळपास थांबले आहेत तर काही शाळांमध्ये मुलेच नसल्याने काही वर्गच गायब झाले आहेत, ही गंभीर बाब दिसून येत आहे. त्यामुळे घटत चाललेल्या पटसंख्येमुळे शाळांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे.
लग्नानंतर तरुण पिढीचे कामानिमित्त गावाबाहेर होणारे स्थलांतर, वाढत्या वयातील अविवाहित तरुणांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करणार नाही आणि शिक्षण व्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम थांबवता येईल, या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.
गंभीर समस्येमुळे भविष्यात निर्माण होणारे इतर सामाजिक प्रश्न यामुळे गावांच्या विकासालाही खीळ बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या निर्माण झालेल्या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्यानी गरज आहे. भविष्यात अशा परिस्थितीमूळे केवळ नाही तर गावातील सामाजिक शाळांच्या पटसंख्या घटण्यावर व आर्थिक जीवनावरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.




