उंब्रज रोटरी क्लब तर्फे नाणेगाव खूर्द शाळेला संगणक संच प्रदान
लोकसत्य न्यूज

चाफळ /उमेश सुतार : संगणक सुविधा असणे ही काळाची गरज आहे, या उद्देशाने रोटरी क्लबने ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक संच देण्याचा उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लबच अध्यक्ष विश्वनाथ केंजळे यांनी केले.
नाणेगाव खुर्द, ता. पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला रोटरी क्लब ऑफ उंब्रज यांच्यातर्फ संगणक संच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सचिव प्रकाश मसुगडे, विनायक जाधव, प्रमोद शहा, राजेंद्र सावंत, मुख्याध्यापिका पूनम माने, सोनाली गायकवाड, धनाजी मोरे, धनाजी पाटील, संतोष पाटील उपस्थित होते.
रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विनायक जाधव यांनी रोटरी क्लब व त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सविधा याची सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. पूनम माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धनाजी मोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास प्रतीक्षा चव्हाण, सुकन्या पाटील, वर्षा पाटील, मेघा पाटील, सुवर्णा पाटील तसेच रोटरी क्लबचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, विद्यार्थीं उपस्थित होते.




