मा. दामले प्रशालेत शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त “विद्यार्थी- शिक्षक महाभोंडला” उत्साहात साजरा
लोकसत्य न्यूज

पुणे-गुलटेकडी/प्रतिनिधी : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विद्यार्थी- शिक्षक महाभोंडल्याचे आयोजन प्रशालेच्या भव्य मैदानात करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर, पर्यवेक्षक श्री.अनिल तंवर सर यांच्या शुभहस्ते शारदा मातेचे पूजन करून पंचारती घेण्यात आली.

यानिमित्त आयलम्मा पैलम्मा गणेश देवा…, एक लिंबू झेलू, बाई दोन लिंबू झेलू…, मै तो आरती उतारू रे…,या गीतांच्या तालावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी या महाभोंडल्यात सहभागी होऊन बहारदार पारंपरिक गाण्याचा ठेका व फेर धरत रास गरबा, दांडिया, झिम्मा फुगडीचा आनंद लुटला.
यावेळी प्रशालेच्या सौ. वैशाली साबळे मॅडम यांनी भारतीय परंपरेनुसार आदिशक्तीचा महिमा वर्णन करत स्त्रियांचा सन्मान, आदिशक्तीची नावे व महात्म्य विविध दाखले यांच्या आधारे सांगत नवरात्र महोत्सवाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना नवरात्र उत्सव निमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन सौ.नयना वाघमारे, सौ. राजश्री पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती.प्रज्ञा इंगळे यांनी केले. विद्यार्थी- शिक्षक महाभोंडला उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे, सेवकांचे व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.




