महाराष्ट्रताज्या घडामोडी

अजय गोरड यांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पदक "पोलीस महासंचालक पदक 2022"

       कराड / उमेश सुतार :  सातारा जिल्ह्यात उंब्रज याठिकाणी पोलीस अधिकारी पदावर काम करीत अनेक कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर तडीपारीच्या कारवाया करीत दमदार कामगिरी केलेले उंब्रज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी अजय गोरड यांची नुकतीच पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.

माळशिरस तालुक्यातील बचेरी गावचे सुपुत्र अजय लक्ष्मण गोरड यांनी बचेरी सारख्या दुष्काळी गावातून प्रतिकुल परिस्थिती असताना त्यांनी या पदाला गवसणी घातली. 2004 मध्ये 18 व्या वर्षी अकोला येथे पोलीस दलात शिपाई म्हणून ते भरती झाले. पोलीस दलात नोकरी करत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 2010 मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. अकोला येथे अडीच वर्षं सेवा केल्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे ग्रामीण येथे व नंतर सातारा व अहमदनगर येथे सेवा बजावली.

       पोलीस दलात नोकरी करीत असताना अतिशय उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल अजय गोरड यांना केंद्रसरकारचे आंतरिक सुरक्षापदक, महाराष्ट्र शासनाचे खडतर सेवा पदक तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पदक पोलीस महासंचालक पदक 2022 मिळाले. अजय गोरड यांना पदोत्रती मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!