कात्रज येथे दोन बसच्यामध्ये सापडून कर्मचारी जागीच ठार
टोईंग करताना योग्य ती काळजी का घेण्यात आली नाही ? या दुर्घटनेला जबाबदार कोण?

कात्रज/लोकसत्य न्यूज : कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पीएमपी बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली असता ती बस टोईंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा दोन बसेसच्या मध्ये सापडून जागीच मृत्यू झाला.
पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी गणेश गुजर हे वय 42 रा. कोथरुड, मूळ गाव भोर असून ते कंत्राटी मेकॅनिक कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते. कात्रज हिंजवडी (ए एच 12 टी व्ही ०३३१) बस बंद पडल्याने ती बस दुसऱ्या पीएमपी (एम एच 14 एच यु 5992) बस द्वारे ड्रॉइंग करून बाजूला घेत होते. टोईंग करण्यासाठी लावलेला रॉड निसटला आणि गणेश गुजर याचा जागीच मृत्यू झाला.
बस बंद पडलेली असताना पीएमपी प्रशासनाने टोईंग व्हॅनचा वापर न करता दुसऱ्या बसने टोईंग का केली? टोईंग व्हॅन उपलब्ध असूनही त्याचा वापर का केला नाही? टोईंग करताना योग्य ती काळजी का घेण्यात आली नाही? या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकातून करण्यात येत आहे. शिवाय दोषीवर कारवाई करण्याची मागणी समाजातून करण्यात येत आहे.
संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. अपघात झालेली बस बाणेर डेपोची असून ती बस कंत्राटदाराची आहे. पीएमपी बसेसचे वजन 12 ते 18 तन असते. त्यामुळे बस टोईंग करताना योग्य ती काळजी का बाळगली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकातून करण्यात आली आहे.



