दूरदृष्टी व संयमी व्यक्तिमत्व रवींद्र सुतार : राजेंद्र वास्के
आकाशवाणीचे सिनीयर टेक्निशियन यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ

चाफळ, (उमेश सुतार) : नोकरीच्या काळात प्रामाणिकपणे सेवा करणारी मंडळी आज हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच सापडतील. आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत प्रामाणिक सेवा केलेले संयमी व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून रवींद्र सुतार यांचेकडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन राजेंद्र वास्के यांनी केले.
विंग येथे सागर मल्टिपर्पज हॉल मध्ये लोहार-सुतार समाज बांधवांच्या वतीने धामणी येथील आकाशवाणी पणजी (गोवा) सिनीयर टेक्निशियन रवींद्र दत्तात्रय सुतार यांचा सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संभाजीराव लोहार हे होते. यावेळी पत्रकार उमेश सुतार, प्रा. भगवान लोहार, मनोहर सुतार, लोहार-सुतार समाज विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संभाजी लोहार म्हणाले, रवींद्र सुतार यांनी आपल्या नोकरीच्या काळात खडतर प्रवास केला आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या समाज बांधवांच्या संघटनेमध्ये योगदान द्यावे.
याप्रसंगी रवींद्र सुतार व त्यांच्या सुविद्य पत्नी उमा सुतार यांचा समाज बांधवाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उमेश सुतार, सचिन लोहार, गजानन लोहार, प्रा. भगवान लोहार, मच्छिंद्रनाथ लोहार, अनिल सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंदा सुतार यांनी केले.



