चाफळ बस स्थानकात केसांचा सडा
अज्ञाताकडून कृत्य, प्रवासी वर्गातून कारवाईची मागणी

चाफळ (उमेश सुतार) : चाफळ येथील बस स्थानकामध्ये रात्री अज्ञाताने सलूनमध्ये कापलेले केस आणून टाकल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप केला जात आहे. पोलिसांनी संबंधिताचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
चाफळ हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण आहे. विभागातील 35 ते 40 गावांचे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, पर्यटक या बसस्थानकावर मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे बस स्थानक परिसरात प्रवाशांची सतत रेलचेल सुरू असते.
मंगळवारी रात्रीच्या सुमारात बस चालकात अज्ञात व्यक्तीने सलूनमध्ये कापलेले केस टाकलेल्या स्थानकात अस्वच्छता पसरली आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाकावर रुमाल ठेवूनच दिवसभर वावरावे लागत आहे. सदरचा प्रकार किळसवाणा असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हा प्रकार नेमका कोणी व कोणाच्या उद्देशाने केला आहे, याचा शोध पोलिसांनी लावावा तसेच संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.



