कात्रज चौकामधील उड्डाणपुलाचे सेगमेंटल लॉन्चिंगचे कामाबाबत वाहतुकीत केलेला बदल
लोकसत्य न्यूज

पुणे (लोकसत्य न्यूज ) : पुणे शहरात कात्रज चौकामध्ये उड्डाणपुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉन्चिंगचे काम करावयाचे असल्यामुळे कात्रज चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्याचे आदेश अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहे.
याकरिता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एमव्हीए 0196/871 सी आर 37 टीआरए 2 दिनांक 27/9/1996 चे नोटिफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम 115 116 (1) ( ए) ( बी) 116 (4) आणि 117 अन्वये अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त वाहतूक पुणे शहर यांचेमार्फत दिनांक 3 /12/ 2024 रोजी पासून पुढील आदेशापर्यंत कात्रज चौक परिसरातील वाहतुकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर बदल करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी असलेले वाहतुकीचे सर्व आदेश रद्द समजण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. कात्रज चौकामध्ये उड्डाणपुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉन्चिंगचे काम करावयाचे असल्यामुळे खालील नमूद रस्त्यावर प्रवेश करण्यात येत आहेत.
जड, अवजड वाहने डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर वेहिकल्स, हेवी गुड्स मोटर वेहिकल, हेवी ट्रान्सपोर्ट वेहिकल, ट्रेलर, कंटेनर्स, मल्टी एक्सेल वाहनांना पुढील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे.
सातारा कडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पूल येथे प्रवेश बंद राहील, साताऱ्याकडून नवीन बोगदा मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद राहील, मुंबई कडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल ते प्रवेश बंद राहील, सोलापूर कडून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील, सासवड कडून मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील, बोपदेव घाट कडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडीमशीन चौक पुढे प्रवेश बंद राहील, मार्केट यार्ड, गंगाधाम, बिबेवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील, स्वारगेट कडून कात्रज मार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
वरील मार्गावरील जड, अवजड वाहनांनी पर्याय मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी जावे त्याचप्रमाणे मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री 10:00 ते स. 4:00 वाजता दरम्यान प्रवेश चालू राहील, परंतु त्यांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील.
एसटी बसेस व ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुकीसाठी पुढील प्रमाणे आदेश काढण्यात आलेला आहे. मुंबई कडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणारे एसटी बसेस व ट्रॅव्हल्स नवले पूल येथे प्रवेश बंद राहील, सातारा कडून स्वारगेट कडे येणारे एसटी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांनी नवले पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन कात्रज येथून स्वारगेटकडे जावे.
सिंहगड रोडवरील एसटी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरील मार्गाचा वापर करावा. मांगडेवाडी, दत्तवाडी, हांडेवाडी व कात्रज परिसरातील नागरिकांनी स्वारगेटकडे जाण्यासाठी शक्यतो कात्रज चौकाकडे न जाता इतर उपलब्ध पर्याय मार्गाचा जास्तीत जास्त वापर करावा, अशा सूचना परिपत्रकाद्वारे वाहतूक शाखा पुणे शहर पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले आहे.



