ताज्या घडामोडीकृषी व व्यापारमहाराष्ट्र
मादी बिबट्याचा दोन बछड्यांसह उसाच्या शेतात मुक्काम
लोकसत्य न्यूज
चाफळ / उमेश सुतार : कळंत्रेवाडी नानेगाव पुनर्वशीत गावठाणात मादी बिबट्याचा बछड्यासह वावर वाढला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक पाळीव कुत्रा ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. रात्री आठच्या सुमारास हा थरार घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नानेगाव पुनर्वशीत गावठाणात उसाचे क्षेत्र भरपूर असल्याने मादी बिबट्याने आपला मुक्काम वाढवला आहे. दोन बछड्यासह शिवारात संचार करणाऱ्या या मादी बिबट्याने आतापर्यंत पाळीव जाणार असं अनेक मोकाट कुत्र्यांचा ही फरशा पडला आहे. या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
गेली अनेक दिवसापासून कलंतत्रेवाडी व पुनर्वस्थित गावठाणात बिबट्याचा वावर आहे. बिबट्या पाळीव जनावरावर हल्ले करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बिबट्याच्या भीतीने घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे यासाठी या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा असे नागरिकांतून म्हटले जात आहे.




