गावठी हातभट्टीची दारू अवैद्यरित्या विक्री करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलीसांकडून अटक
भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी
कात्रज/लोकसत्य न्यूज : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील गावठी हातभट्टीची दारू अवैद्य रित्या विक्री करून सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा सराईत गुंड नामे. अर्जुन सतपाल कुंभार वय 24 वर्षे, राहणार रूम नंबर 2 पाझर तलावाशेजारी, जांभूळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे यास एमपीडीए कायद्यांतर्गत नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबद्ध केले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की पुणे शहरातील वाढत्या अवैध गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीर विक्रीस आळा बसवणे बाबत मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले होते. त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचा गुन्हे अभिलेखावरील अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा सराईत व अट्टल गुन्हेगार नामे. अर्जुन सतपाल कुंभार, वय 24 वर्षे, राहणार रूम नंबर 2 पाझर तलवा शेजारी, जांभूळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे याचे विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे सन 2021 पासून अवैध गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीर विक्रीचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. अशा इसमांचे वाढते गुन्हेगारी कारवाईला आळा घालण्यासाठी सन 2022 व 2024 म.प्रो.अॅ. 1949 चे कलम 93 प्रमाणे कारवाई करून देखील त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काहीही सुधारणा झालेली नव्हती.
नमूद सराईत गुंड व स्थानबद्ध इसम नामे. अर्जुन सतपाल कुंभार, वय 24 वर्षे, राहणार रूम नंबर 2 पाझर तलावा शेजारी, जांभळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे याचे विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करूनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला नव्हता. तो अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याने आणि ही मानवी शरीरास अपायकारक असून त्यामुळे सदर परिसरातील गावठी दारूचे सेवन करणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच गावठी हातभट्टीची दारू सेवन करणाऱ्या इसमांच्या संसारात कलह निर्माण होऊन पत्नीस मारहाण करणे, मुलांना मारहाण करणे तसेच दारूसाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी करणे अशा घटना घडतात तसेच दारूचे सेवन करून नशेत शरीरा विरुद्ध गुन्हे करतात. सदर इसमाच्या गावठी हातभट्टी दारूमुळे अनेक तरुण मुले दारूच्या आहारी गेले आहेत. तो राहत असलेल्या परिसरात राहणाऱ्या महिलांच्या मध्ये भीती पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. सदरची गावठी दारू पिल्याने दारूच्या नशेत लोक अशोमनीय वर्तन करतात, नशेमध्ये रस्त्यामध्ये पडतात, सार्वजनिक ठिकाणी लघु शंका करतात, उलट्या करतात व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करतात, महिला तसेच मुलींची टिंगल टवाळी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.
सदर ठिकाणचे रहिवासी त्रस्त झाले आहेत तसेच सदर इसमाच्या गावठी दारूच्या धंद्यावर गुंड प्रवृत्तीची लोक येतात त्यामुळे सदर परिसरामध्ये भितीचे वातावरण झाले असून सार्वजनिक शांततेचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शांतताप्रिय नागरिकांना सदर परिसरामध्ये राहणे त्रासदायक झाले आहे म्हणून श्री डी. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबद्ध करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त पुणे यांना सादर केला होता, सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिनांक 31.10.24 रोजी नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून नमूद गुन्हेगार इसमास दि. 1. 10 .2024 रोजी ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांकडून मोक्का तसेच एमपीडीए कारावाई गुन्हेगार यांच्यावर करण्यात येत आहे. यापुढेही अभिलेखावरील गुन्हेगारावर यासारख्या ठोस व प्रभावी कारवाया करण्यात येत आहेत. सराईत गुन्हेगाराकडून अशा प्रकारे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलिसांकडून समाजकंटक व अट्टल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री अनितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री प्रविण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि.2, पुणे शहर, मा. नंदिनी वग्यानी, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री डी एस पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, श्री शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भादड व सहाय्यक पो. फौजदार चंद्रकांत मानेसाहेब, पो. हवा. 6512 विशाल वारुळे, पो.शी. 8138 सावंत, पो.शि. 4955 स्वप्निल बांदल यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेऊन प्रस्ताव तयार केलेला आहे.




