पाल गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मा. पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील
मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणासाठी बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचे भूमिपूजन...
पाल/लोकसत्य न्यूज : कराड तालुक्यातील मौजे पाल येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. बाळासाहेब पाटील यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
गावचे दैवत श्री मार्तंडाचे दर्शन घेत उपस्थित माता-भगिनी व ग्रामस्थांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मंदिराच्या आवारात श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट मार्फत वॉटर एटीएमची व ३० के. व्ही. जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून त्याचे उद्घाटन केले. या कार्यामुळे भाविक भक्तांची योग्य ती सोय होणार आहे.

सन २०२४-२५ सालच्या कोयना भूकंप निधीमधून संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून त्या कामाचा शुभारंभ केला. अल्पसंख्यांक बहुल योजनेमार्फत मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणासाठी बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचे भूमिपूजन शुभारंभाचा श्रीफळ वाढवून केले. कोयना भूकंप निधी (सन २०२३-२४) या योजनेमार्फत श्री दत्त मंदिराच्या बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचे व पाल विकास सेवा सोसायटीच्या स्वनिधीतून साकारण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन केले.

गावच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रेमाने केलेला सत्कार स्वीकारून त्यांचे आभार मानले. जनतेचे प्रेम हीच माझी खरी शक्ती आहे. गावच्या विकासासाठी आवश्यक इतका निधी मिळवून देण्यात येईल, निधी कमी पडू देणार नाही, याबाबतची हमी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. बाळासाहेब पाटील यांनी गावकऱ्यांना दिली.
यावेळी देवराज दादा पाटील, बाळासाहेब जगदाळे, सर्जेराव खंडाईत, भास्कर गोरे, उद्धव फाळके, जमीर मुल्ला, सलीम मुल्ला, अब्दुल सुतार, निजाम मुजावर, बादशाह शेख, रफिक सुतार, नूरमहम्मद सुतार, करीम सुतार, अक्तर मुल्ला, युनूस सुतार, दत्तात्रय दळवी तसेच पाल गावातील आणि भागातील ग्रामस्थ, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




