महात्मा गांधी विद्यालयात महाभोंडल्याचे आयोजन
राजगुरुनगर शहरातील नवदुर्गाचा केला सन्मान

राजगुरुनगर (लतीफ शाह, सर) ता. २७ : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजगुरुनगर येथे नवरात्रीनिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते,
विद्यालयातील इयत्ता ५ ते १० वी मधील १००० विद्यार्थिनी सहभागी झाल्या याप्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या राजगुरुनगर शहरांमधील नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मोहिनी सांडभोर, संजीवनी मिसाळ, शुभांगी बल्लाळ, सपना राठोड, धनश्री ढवळे, हिना कुंभार, मयुरी भवारी, यशोदा थिगळे यांचा सत्कार करण्यात आला.
स्त्रियांनी स्वतःमधील आत्मविश्वास जागृत ठेवून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, चाकोरी बाहेर जाऊनआपलं अस्तित्व निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या हर्षदा श्रोत्रिय यांनी व्यक्त केले.

यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ऊर्मिला सांडभोर, प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका आस्मिता पाठक,पर्यवेक्षक रेखा जाधव, सोपान निसरड, हौशीराम मुठे, सुनीता ठाकूर, लतीफ शाह उपस्थित होते.
महाभोंडल्याचे आयोजनामध्ये पारंपरिक भोंडला गीत, फेर,फुगडीच्या खेळांचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. सूत्रसंचालन नयना लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शिल्पा जाधव, कविता मुळूक, वैशाली काळे यांनी केले.




