पुणे (लोकसत्य न्यूज) : ” अब तो बंद करो पब” ” विधयचे माहेरघर अता झाले शराबघर” “बच्चों को लासेन्स क्लास के साथ निबंध क्लास भी लगाए” “निबंध लिहिलेले कागद गाडीत ठेवले तर चालेल का” ” निषेध निषेध” अश्या पाट्या हातात घेउन प्रहारचे दिव्यांग नागरिकांनी झालेल्या घटनेचे निषेध करून मृत्युंना श्रद्धांजली वाहिली.
या वेळी प्रहारचे पुणे शहर अध्यक्ष विष्णुपंत गुंडाळ, सचिन ओव्हाळ, प्रसिद्दि प्रमुख रफ़ीक खान ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, प्रहार जिल्हा राज्य दिव्यांग कर्मचारी अध्यक्ष डॉ प्रवीण सोलंकर, पारा टार्गेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष गाड़े, जालिंदर मलकुनाईक ,रंजना गाडवे आणि रघुनाथ सातव उपस्थित होते.

रफीक खान यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ” पुणे विद्याचे माहेरघर असून पब मुळे शहर शराबचे घर झाले, आपला देश साधु संतांचा, पीर मुर्शीदचा, सुसंकृत आणि सभ्यता पूर्ण देश आहे. तरी या पब मुळे युवा पीढ़ीची वाट लागत आहे, बाल गोपालना सर्रास दारू विक्री होते, पिण्याची सेवा दिली जाते, सर्व प्रथम ही पब बंद केली पाहीजे, तरच आपल्या देशाची प्रतिमा साबुत राहिल.
डॉ प्रवीण सोलंकर म्हणाले की पालकांनी आपल्या अल्पवनिय मुलांना गाड़ी देउ नय तसेच मुलांवर आपली नजर ही ठेवावी. सातव म्हणाले पुणे शहराचे वाहतुकीचे नियम सध्या नागरिक पालत नाही ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांना नाहक़ जीव गमवावा लागतो. सचिन ओहवहाळ म्हणाले, दोन निर्दोष व्यक्तिचे मृत्युचे कारण झालेल्याना ३०० शब्दlचे निबंधची शिक्षा देणे म्हणजे न्याय व्यवस्थेवर काय बोलावे तेच कळत नाही. गुंडाळ म्हणाले की ‘ आज त्या दोघांचे कुटुंब फार भयंकर दुखात बूड़ले आहे, कुटुंबाचे आधार बनlयची वेळ आली आणि ते अश्या दुर्दैवी दुर्घटनामधे निघुन गेलेत”




