ताज्या घडामोडी

काळविटाच्या शिंगाची तस्करी प्रकरणी 4 जण ताब्यात

कराड वनविभागाची दमदार कारवाई, 4 काळवीट शिंगे व 4 मोबाईल हँडसेट हस्तगत

       चाफळ, (उमेश सुतार) : सातारा उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज, सहा. वनसंरक्षक महेश झाझुर्णे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल, वराडे वनपाल व इतर वन कर्मचारी यांनी संयुक्तरित्या सापळा रचून मौजे वारुंजीफाटा अन्नपुर्णा हॉटेलसमोर काळवीट या वन्यप्राण्याची शिंगे जवळ बाळगून तस्करी करीत असताना आरोपी रत्नाकर हणमंत गायकवाड, (वय 42 वर्षे रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली), अमर भगवान खबाले (वय 35 वर्ष रा. कराड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर तस्करीमध्ये आणखीन तीन जण सामील असल्याचे समजले. तदनंतर इलाही सय्यद शेख, (वय 50 वर्ष मूळ रा. कराड) व विशाल संभाजी शिंदे (वय 31 वर्ष रा. कराड) यांना ताब्यात घेण्यात आले.
       सदर आरोपी यांचेवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला असून आरोपीकडून 4 काळवीट शिंगे व 4 मोबाईल हँडसेट जप्त केले आहे. सदर चौकशीत आरोपींनी जप्त शिंगे ही त्यांना पाटण येथील रहिवाशी चंद्रशेखर भिकाजी निकम (सेवानिवृत्त रेल्वे पोलीस) यांचेकडून मिळाली असल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हे प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.
       या कारवाईत कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, पाटण वनक्षेत्रपाल आर. एस. नलवडे, वराडे वनपाल सागर कुंभार, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, कोळे वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक सचिन खंडागळे, शितल पाटील, अभिजीत शेळके, सुभाष गुरव, शंकर राठोड, कैलास सानप व इतर वन कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
       वन्यप्राण्याची शिकार व अवयवाची तस्करी करीत असताना कोणी निदर्शनास आल्यास टोल फ्री क्र. 1926 वर कॉल करावा किंवा नजीकच्या वनक्षेत्रपाल कार्यालयाशी संपर्क साधावा.
Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!