पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल-मापाडी यांच्या दरवाढीला शेतकरी संघटनेचा विरोध – शिवाजी नाना नांदखिले
लोकसत्य न्यूज

पुणे (लोकसत्य न्यूज) : 13 जून 2024 कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे कार्यालयात हमाल मापाडी यांच्या दरवाढी संदर्भात आयोजित बैठकीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून शिवाजीनाना नांदखिले यांनी उपस्थिती लावली. या बैठकीस पुणे जिल्हा निबंधक जगताप साहेब सहाय्यक जिल्हा उपनिबंधक तावरे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव धोंडकर साहेब, तसेच हमालीमापाडी संघटनेचे अध्यक्ष संचालक, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व्यापारी सदर बैठकीला उपस्थित होते.
शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहे. शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यावर व्यापाऱ्यांकडून आकारले जाणाऱ्या हमालीमापाडीमध्ये शेतकऱ्यांचे पैसे वजा केले जात आहेत. त्यातच वाढ करणे म्हणजे जुलमी वसुली करणे. याबद्दल शेतकरी प्रतिनिधी म्हणून या वाढीव हमाली तोलाईला शेतकरी संघटने कडून विरोध केला. तसेच यापूर्वी आकारण्यास जाणाऱ्या हमालीतूनही पैसे कमी करण्यासाठी सांगितले सध्या पन्नास किलो गोणीसाठी 5 रुपये हमाली होती.
हमाल संघटनेकडून ही हमाली 6 रुपये प्रति गोणी करण्याचे मांडले होते. पण असे न करता ही हमाली 4 रुपये करण्याची मागणी शिवाजीनाना नांदखिले यांनी केली. ही मागणी मान्य करून घेतली त्याचे प्रोसिडिंगही केले. तसेच 10 किलो, 20 किलो प्लास्टिक कॅरीबॅग साठी 2.5 रुपये हमाली होती ती आता 1.5 रुपये करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाचणार आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातील इतर बाजार समिती पेक्षा जास्तच हमाली तोलाई घेतली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी सोलापूर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, वाशी या बाजार समितीमध्ये माल विकण्यासाठी जात आहेत. याकडेही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने लक्ष घालावे आणि जास्तीत जास्त शेतकरी आपल्याच मार्केटमध्ये माल विकतील याबद्दलही विचार करावा.



