दिवाळी सणानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल
अमोल झेंडे-पोलीस उपआयुक्त, वाहतूक विभाग यांच्यामार्फत आदेश
पुणे /लोकसत्य न्यूज : आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी 5 नोव्हेंबर पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे अमोल झेंडे पोलीस उपआयुक्त, वाहतूक विभाग, पुणे शहर यांच्याकडून देण्यात आली.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील बाजारपेठा मधील दिवाळी सणानिमित्त खरेदी करता ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते खरेदी करता येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यातच पार्क करीत असल्याने मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते.
महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एन. व्ही. ए. 0196/871 सी आर 37/टी आर ए 2, दिनांक 27/9/1996 चे नोटिफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम 115 116 (1) (A) (B) 116 (4) आणि 117 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून अमोल झेंडे पोलीस उपायुक्त वाहतूक, पुणे शहर यांनी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूकित अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी खेरीज करून आवश्यकतेनुसार खालील प्रमाणे बदल करत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
शिवाजीनगर वरून शिवाजी रोडने जाणारी चार चाकी वाहने स.गो. बर्गे चौकाकडून वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग जंगली महाराज रोडने टिळक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
स्वारगेट वरून बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौक मार्गे जाणारी चार चाकी वाहने पुरम चौकामधून डावीकडे वळून टिळक रोडने एस पी कॉलेज, अलका चौक मार्गे जातील. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.
फुटका बुरुज वरून जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. पर्याय मार्ग शिवाजी रोड ने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील. शनिवार चौकाकडून मंडईकडे जाणारी वाहतूक व कुमठेकर रोड वरून मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल, पर्याय मार्ग बाजीराव रोडने पुढे जातील.
पार्किंग बाबत बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कमटेकर रोड, केळकर रोड व मंडई या भागातील खरेदी करता येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने बाबू गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ या ठिकाणी पार्क करावीत.




